तुळजापूर , दि . ६ 

  श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या  अनुषंगाने तुळजापूर शहरात पोलीस दलाचे बुधवारी पथ संचलन करण्यात आले आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी  डाँ सई भोरे-पाटील पोलीस निरीक्षक  आजिनाथ काशीद  यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात हे पद संचलन करण्यात आले.
 यावेळी  सई भोरे-पाटील यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नवरात्र दरम्यान कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त चोख राहील अशी हमी दिली आहे..सर्व तुळजापूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे.
 
Top