ताज्या घडामोडी

वागदरी , दि .६: एस.के.गायकवाड


दहिटणा ता.तुळजापूर येथील  महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या  अध्यक्षपदी विजयकुमार नागरसे तर उपाध्यक्षपदी बंडा  कदम यांची निवड करण्यात आली आहे.


    
या गावचे  विद्यमान   सरपंच आप्पासाहेब बिराजदार  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दहिटणा येथे ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत खेळीमेळीच्या वातावरण तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विजयकुमार नागरसे यांची तर उपाध्यक्ष पदी बंडू  कदम यांची निवड करण्यात आली.
 याप्रसंगी उपसरपंच सोमनाथ गुडडे, ग्रामसेवक राठोड, सामाजिक  कार्यकर्ते राजकुमार नागरसे, नागनाथ पाटील,, बलभीम कदम,  उमाकांत कदम ,धनराज कदम,इलाई शेख आणू सावकार, शंकर चव्हाण, शंतनु कदम, संतोष भोंडवे, बलभीम गुड्डे,मुजीप शेख, प्रवीण बिराजदार,रोहित नागरसे सुहास कदम, ग्रा.प.सदस्यासह ग्रामस्थ उपस्थिती होते.
यावेळी तंटामुक्त गाव समितीचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ग्रामस्थांनी आभिनंदन केले.
 
Top