उस्मानाबाद , दि . ५


भारत यात्री नागराज बेंगलोर मधील एम टेक झालेलला तरुण नागराज कलकुटगर हा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी पदयात्रा करत आहे.   बुधवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी त्यांचे उस्मानाबाद येधे आगमन झाले. सुप्रसिद्ध कवी आणि किसान सभेचे जिल्हा सचिव सुदेश इंगळे यांनी त्यांचे स्वागत केले.

 दिल्ली चलो घोषणा देत, १४८ दिवसांपासून त्यांची पदयात्रा सुरू आहे. ३८०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे.  दि .११ फेब्रुवारी २०२१ रोजी ही पदयात्रा मलेमहादेश्वर गाव जिल्हा शामराजनगर येथून सुरू केली . मधल्या काळात दुसऱ्या   लॉकडाऊनमधे कडक प्रतिबंधामुळे दोन महिने ही यात्रा स्थगित होती, त्यानंतर ३ जुलै २०२१ रोजी चित्रदुर्ग येथून ही यात्रा पुन्हा सुरू केली. ५ ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद शहरात त्यांचंचेआगमन झाले आहे.
अखिल भारतीय किसान सभा उस्मानाबाद जिल्हा कौन्सिल आणि स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया उस्मानाबाद कमिटीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. 


त्यांना आंदोलनाचा पुरस्कार करणारा शरीरावर परिधान करण्याचा बॅनर भेट देण्यात आला. तसेच Peasants Struggle ही पुस्तिका भेट देण्यात आली.

"मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे सरकार नजरअंदाज करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याच काम देखील मागील वर्षभरात झालं. इतकं सगळं असताना शेतकरी मागे सरला नाही. त्यांनी ठाण मांडून दिल्लीच्या सीमेवर ऊन, वारा ,पाऊस ,थंडी या नैसर्गिक संकटांना तोंड देत आणि सरकारी यंत्रणांची दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहे.


माझ्यासारख्या तरुणास हे सगळं बघून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करत लोकांमध्ये जागृती करत हे दीर्घ काळ सुरू असलेले आंदोलन जिवंत राहावे यासाठी मी निघालो आहे. माझा उद्देश एवढंच की शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला तर जग जगेल. त्यासाठी शेतकऱ्याचा मालाला हमीभाव ही मागणी मला खूप महत्त्वाची वाटते. शेतीच आर्थिक धोरण ठरलं पाहिजे, हा मुख्य विषय आहे. हा उद्देश घेऊन जात असताना रस्त्यावर जो भेटेल त्याला माहिती देणे, त्याला समजावणे आणि पुढचं गाव शहर करीत  दिल्ली पोहचायचे आणि त्या आंदोलनात सामील व्हायचे आहे.


26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनास एक वर्ष पूर्ण होईल त्यादिवशी दिल्ली येथील सिंघु बॉर्डर येथे पोहोचून या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा साक्षिदार होण्याची माझी इच्छा आहे. हे आंदोलन एक दिशादर्शक ठरत आहे,सर्वांनी यात सामील झाले पाहिजे असे मला वाटते ,अशी भावना नागराज यांनी व्यक्त केली.

यावेळी लखिमपुर खेरी मधील क्रूर घटनेचा अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कौन्सिलने तीव्र निषेध केला. पुढील प्रवासासाठी नागराज यांना क्रांतिकारी शुभेच्छा देण्यात आल्या.
 
Top