चिवरी , दि . ६ :  राजगुरू साखरे 


तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे  श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवार दि. ७ रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. महोत्सवासाठी चिवरी नगरी सज्ज झाली आहे. 



कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे भाविकांसाठी बंद असलेले महालक्ष्मीच्या मंदिराचा दरवाजा आता उघडणार आहे, त्यामुळे भाविकातून समाधान व्यक्त होत आहे , महालक्ष्मी मंदिर   हे नळदृर्ग पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहे, महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भक्तगण येत असतात, महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असतो, त्या पार्श्वभूमीवर  आठवडाभर मंदिराचा परिसर स्वच्छता करण्यात आली आहे, मंदिर आवारातील वीज प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, रंगरंगोटी आदी करण्यात आले आहे, गेली दोन वर्षे मंदिर बंद असल्याने यावर्षी नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी शक्यता पुजारी मंडळाकडून वर्तवली जात आहे , त्याचबरोबर व्यापारीवर्ग दुकानात साहित्याची रेलचेल करण्यात मग्न आहेत, 

सध्या पूजेचे साहित्य , श्रीफळ, पेढे विक्रेते , अन्य साहित्य सह व्यापारी दुकाने स्वच्छ करत असल्याचे दिसत आहे, कोरोनामुळे दीड ते दोन वर्षात श्री महालक्ष्मीसह राज्यातील मंदिर बंद होती . मात्र आता मंदिर खुली करण्यात आली असून भाविकांची रेलचेल वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, मंदिरे सुरू करण्याच्या निर्णयानंतर पुजारी मंडळ व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
 
Top