तुळजापूर दि ६:  डॉ. सतीश महामुनी

मागील पावणेदोन वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या भावीक भक्तांना शारदीय नवरात्र महोत्सवात देवीचे दर्शन खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविक भक्त मध्ये प्रचंड उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे,

 मागील चार दिवसांपासून तुळजापूर शहर भाविकांनी गजबजून गेले आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता परंपरागत पद्धतीने विधीवत घटस्थापना होईल व शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींना सुरुवात होईल.

 महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी च तुळजापूर येथील मंदिरात दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत घटस्थापना उत्सव साजरा होत आहे.  या घटस्थापने बरोबर तुळजाभवानी देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात होत आहे.

मागील पावणे दोन वर्ष  कोरोना आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते, राज्य सरकारने आजपासून मंदिर भाविकांना खुले करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे मागील चार दिवसांपासून तुळजापूर येथे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून भाविक भक्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत यानिमित्ताने भाविकांना मागील चार दिवसांपासून महाद्वार दर्शन दिले जात आहे.

कोरोना नियमांचे पालन करीत मर्यादित सुट्टीमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतल्यानंतर दुपारी बारा वाजता होणाऱ्या घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होईल जिल्हाधिकारी तथा संस्थांचे अध्यक्ष डॉ. कौस्तुभ दिवेगावकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील ,नगराध्यक्ष सचिन रोचकरी, संत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. मागील २९ सप्टेंबरपासून तुळजाभवानी देवी ने सुरू केलेली मंचकी निद्रा बुधवारी रात्री पूर्ण झाली, विधिवत पद्धतीने तुळजाभवानी देवीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर मध्यरात्री प्रतिष्ठापित करण्यात आली यावेळी देवीच्या मूर्तीला दही आणि दुधाचे अभिषेक करण्यात आले. परंपरागत पद्धतीने वानी मातेची मंचकी निद्रा आणि त्यानंतरचे धार्मिक विधी मंदिराच्या गाभार्‍यात संपन्न झाले. 

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तुळजापुरात मागील आठ दिवसांपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत जड वाहनांना तुळजापूर पासून प्रवेश बंदी करण्यात आली आहे चार चाकी वाहने यांना प्रवेश दिला जात नाही. राज्यभरातून भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दोन दिवसापासून तुळजापुरात आहे राजे शहाजी महाद्वार पासून या नवरात्र मंडळ कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत भवानी ज्योत आपल्या गावाकडे नेलेल्या आहेत. दुपारी बारा वाजता तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात परंपरागत पद्धतीने घटस्थापनेचा सोहळा साजरा होणार आहे तत्पूर्वी तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजा होईल देवीची आरती झाल्यानंतर येथील पारंपरिक पुजारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर हे सपत्नीक घटस्थापना करतील.

शहरामध्ये हजारो भाविक भक्त भवानी मातेचे दर्शन महाद्वारापासून घेऊन परतीचा प्रवास करीत आहेत, आमच्या अनेक पिढ्या पासून आम्ही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतो  अशी भावना शारदीय नवरात्र निमित्ताने बीड जिल्ह्यातील कदम वाडी येथील भाविक सदाशिव वाळेकर यांनी व्यक्त केली.
 
Top