जळकोट,दि.६ ,


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिजाऊ नगर मधील रहिवासी सौ. गंगाबाई हरिदास मोरे वय ८५  यांचे बुधवार दि.६ रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्या  शिवसेना तुळजापूर तालुका  उपप्रमुख कृष्णात मोरे यांच्या आई होत.

वारकरी संप्रदायात त्या सतत कार्यरत असत. त्यांच्या पार्थिवावर सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,३ मुले,३ मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. वारकरी संप्रदायातील हरिदास मोरे यांच्या त्या पत्नी तर तुळजापूर तालुका शिवसेनेचे उपप्रमुख कृष्णात मोरे यांच्या त्या आई होत.
 
Top