जळकोट , दि . ५ :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या महामारी मुळे संपुर्ण राज्यभर शाळा बंद होत्या.आज पासून पाचवी ते सातवी शाळा चालू करण्यात आले आहेत. कोविडचे नियम पाळून शाळा आजपासून सुरू झाल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने शिक्षकांनी त्यांचे फुल देऊन स्वागत केले. यावेळी प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण,सुरेश कोकाटे, संतोष दुधभाते, मुक्कम, साबळे, बालाजी राठोड,किरण ढोले,बी.जे.हाके, पाटील, ,पाठक, राठोड,कदम,कल्पना लवंग, प्रमिला कुंचगे,अमित खारे सह शिक्षकवृंद उपस्थित होते.