नळदुर्ग , दि .५ : 

स्वच्छता ही सेवा अमृत महोत्सवी उपक्रमा निमित्त तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामसभा घेऊन स्वच्छ गाव हांगणदारी मुक्त  (ओडीएफ)  आधिक म्हणून जाहीर करण्यात आले.

दि .2 आक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आलियाबाद ता .तुळजापूर येथे सरपंच ज्योतीका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. हगंणदरी मुक्त गाव असलेल्या आलियाबाद  ‌गावास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीथी मध्ये  जाहीर करण्यात आले.व स्वच्छता ही‌ सेवा‌ या उपक्रमा निमित्त ‌शपथ‌ घेण्यात आली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले, अमृता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार,रेखा चव्हाण, सिताराम राठोड, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील,ॲड बाबुराव पवार, महादेव राठोड, पांडुरंग चव्हाण,शिवाजी चव्हाण,व्यंकट राठोड,शंकर राठोड,सिद्राम पवार, यशवंत राठोड,राजाराम पवार,किरण चव्हाण, शंकर ‌चव्हाण, हरीचंद्र जाधव,पिन्टु चव्हाण, गोविंद जाधव, शांताबाई चव्हाण,शानुबाई चव्हाण, रेश्मा चव्हाण,पारूबाई राठोड,शानुबाई‌ पवार ,दुरदर्शन प्रतिनिधी बनसोडे,पाणी पुरवठा उप अभियंता  मिलिंद देशपांडे, बांधकाम उप अभियंता ए.आर.खान , शाखा अभियंता बिराजदार ,विस्तार अधिकारी के.बी. भांगे, जिल्हा स्वच्छता समन्वयक हणमंत गादगे,, रियाज शेख,ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

गाव ODF+झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सरपंच चव्हाण व ग्रामसेवक भोसले यांचा सत्कार केला.यावेळी प्लस्टिक संकलन केंद्राचे उद्घाटन अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
Top