काटी , दि .५
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील द्राक्ष बागायतदार महादेव वडणे यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल वैष्णवी ग्रुपचे सर्वेसर्वा हनुमंत गवळी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
पुणे येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने त्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. या सत्कार समारंभावेळी वैष्णवी ग्रुपचे सदस्य नानासाहेब कदम, गोविंद गवळी, दत्ता कादे, राम जाधव, नागेश मोरे, पत्रकार भैय्या कुलकर्णी, दत्तात्रय शिंदे इत्यादी उपस्थित होते.