नळदुर्ग , दि . ५ : विलास येडगे
नळदुर्ग शहर विकास कामात विरोधकानी वारंवार निर्माण केलेले अडथळे मोडीत काढुन नगरपालिकेने सोमवारी सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या २२ विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे. आता विरोधकांनी रडीचा डाव न खेळता शहर विकास कामात सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलतांना केले.
गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी फक्त आणि फक्त शहर विकास कामात अडथळा आणला. विरोधकांच्या या धोरणामुळे गेल्या पाच वर्षात शहरात विकास कामे होऊ शकले नाहीत.२०१८ पासुन विरोधकांनी नगरपालिकेने काढलेल्या कामाच्या निविदा कमी दराने भरुन कामे घ्यायचे आणि नंतर ते काम करायचे नाही, हे धोरण अवलंबले होते. विरोधकांच्या या कृतीमुळे शहराचा विकास रखडला आहे. वास्तविक पाहता विरोधकांनी आम्हाला शहर विकास कामात राजकारण बाजुला ठेऊन सहकार्य करणे गरजेचे होते. ज्या ठेकेदारांनी कमी दरात काम घेऊन ती कामे न करता नगरपालिका प्रशासन व शहरवासीयांना वेठीस धरण्याचे काम केले. त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम नगरपालिकेने केले. त्याचबरोबर आता सन २०२१ मध्ये नगरपालिका अधिनियमानुसार अत्यंत कडक नियम लागु करून शहरांतील २२ नव्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. त्या सर्व निविदा मंजुर झाल्या असुन या कामांचा शुभारंभ दि.४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती अशोक जगदाळे यांनी यावेळी दिली.
हे सर्व विकास कामे पुर्ण झाल्यानंतर शहराचा कायापालट होणार आहे. नागरीकांनी कामामध्ये अडथळा न आणता ठेकेदारांकडुन चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे असेही शेवटी अशोक जगदाळे यांनी म्हटले.
या कामांच्या शुभारंभ कार्यक्रमास नगरसेवक नितीन कासार,, नगरसेविका सुमन जाधव, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शफी शेख,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, शब्बीर कुरेशी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, मारुती खारवे, नवल जाधव, अमित शेंडगे, रघुनाथ नागणे, शिवाजी धुमाळ,शिवाजीराव वऱ्हाडे, नभिक समाजाचे राजेंद्र महबोले, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह नागरीक उपस्थित होते.
साठेनगर येथे ६० लाख, दुर्गानगर येथे १६ लाख, रहीम नगर येथे ४९ लाख, अलियाबाद स्मशानभुमी ३९ लाख, नॅशनल हायवे ते शास्त्री चौक या रस्त्यासाठी ७१ लाख रुपये, मराठा गल्ली येथील रस्ता कामासाठी ११ लाख ५५ हजार रुपये, या कामासह एकुण ६ कोटी रुपये खर्चांच्या विकास कामांचा शुभारंभ अशोक जगदाळे यांच्या करण्यात आले आहे.