नळदुर्ग , दि . ४ :
गावाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनाची सांगड घालून गाव स्वयंपूर्ण कसे करता येईल याबाबत सगळे मिळून प्रयत्न करू अशी ग्वाही उस्मानाबाद जि .प . अध्यक्षा अस्मिता काबंळे यानी रामतीर्थ ता. तुळजापूर येथे बोलताना दिली.
तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ,येडोळा ,जखणी तांडा ,गायरान तांडा व रामनगर या पाच गावांमध्ये एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद याच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामे करण्यात आली आहेत. यामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र, शाळा संगणीकरण, वृक्षारोपण, विद्युतीकरण, बायोगॅस, सामुदायिक सुविधा केंद्र, स्वच्छतेसह विविध विकास कामे तीन वर्षांमध्ये करण्यात आली आहे. दि. 3 ऑक्टोंबर रोजी रामतीर्थ येथे उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे यांच्याकडून या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती रेणुकाताई इंगोले ,सरपंच बालाजी राठोड ,दिलासा चे प्रकल्प समन्वयक विलास राठोड, गुरुदेव राठोड ,भूषण पवार ,श्रीमंत राठोड , भिवाजी इंगोले ग्रामपंचायत सदस्य बारुबाई राठोड ,बचत गटाच्या निर्मला राठोड , सिताराम राठोड, मारुती राठोड, सिताराम चव्हाण, शेषराव राठोड ,सुरेश राठोड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.