नळदुर्ग , दि . २ : विलास येडगे 

वारंवार लेखी आश्वासन देऊनही मराठा गल्ली येथील रस्त्याचे काम न करणाऱ्या नगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात शुक्रवार  दि.१ ऑक्टोबर रोजी शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने नगरपालिकेवर बोंब ठोक मोर्चा काढुन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व मुख्याधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.


मराठा गल्ली येथील नागरीकांनी वारंवार नगरपालिकेत निवेदन देऊन रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासुन नगरपालिका रस्ता करण्याचे फक्त आश्वासनच देत आहे. परंतु आजपर्यंत मराठा गल्ली येथील रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने आंदोलन करून झोपलेल्या नगरपालिका प्रशासनास जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दि.१ ऑक्टोबर रोजी शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांचा निषेध करीत मराठा गल्ली येथुन नगरपालिकेवर बोंब ठोक मोर्चा काढण्यात आला. 


या मोर्चामध्ये मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, उपाध्यक्ष निखिल येडगे, श्रीकांत सावंत, कोषाध्यक्ष संतोष मुळे, सुहास येडगे, तानाजी जाधव,विलास येडगे, पांडुरंग गायकवाड, शिवाजी चौधरी, महादेव जाधव, बाबुराव सुरवसे, जोतिबा येडगे, राहुल गायकवाड, सुधीर हजारे, शाम शिंदे,शिवाजी सुरवसे, युवराज जगताप, संदीप हजारे,नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले, सचिन सावंत, कुलदीप येडगे प्रशांत पवार, विशाल जगताप, धनाजी जाधव, अभिजित किल्लेदार, अविनाश जाधव, मनोज जाधव, राजेंद्र किल्लेदार, अमोल जाधव, स्वप्नील जाधव, सोमनाथ पवार, विनोद काळे, अजिंक्य जाधव,अभिषेक सावंत,आकाश काळे, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


हा मोर्चा मराठा गल्ली येथुन निघुन गवळी गल्ली, चावडी चौक जय भवानी चौक, शास्त्री चौक,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे नगरपालिकेवर धडकला. मोर्चा नगरपालिकेवर गेल्यानंतर त्याठिकाणी मुख्याधिकारी निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी कांही काळ वातावरण तणावाचे बनले होते. मात्र न.प.चे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार हे निवेदन घेण्यासाठी आल्यानंतर वातावरण शांत झाले. 

या मोर्चाला नगरसेवक नय्यर जहागिरदार, शाहाबाज काझी, उदय जगदाळे, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, शहर भाजप अध्यक्ष पद्माकर घोडके,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, सुनिल बनसोडे, पांडुरंग पुदाले,एमआयएमचे मन्सूर शेख, युसुफ शेख यांनी पाठिंबा दिला.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जीविशाचे धनंजय वाघमारे व पोतदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
Top