तामलवाडी , दि .३१ :

 बामणी तालुका उस्मानाबाद हल्ली मुक्काम गणेश नगर उस्मानाबाद  येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रोहिदास शंकर गुजर वय वर्षे 65 यांचे  अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता कपिलधारा स्मशानभूमी उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ,  पत्नी , दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे . त्यांनी लोहारा ,उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद या तालुक्यात महसूल विभागात   कार्य केलेले आहे. 
 
Top