अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे.
दिवाळी सणासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आकाश कंदील,पणत्या आदींची अनेक दुकानामध्ये सजावट दिसून येत आहे.
किराणा दुकानसह इतर दीपावलीच्या साहित्याची दुकाने थाटली आहेत.आणि ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.
कपडे,आकाशदिवे,पणत्या, रांगोळी,फुले आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत.
इतकी बाजारपेठ सजली असून सुद्धा सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.कारण दरवर्षी दिवाळीवर दुष्काळाचे सावट असते मग तो ओला दुष्काळ असो की कोरडा,परंतु अशा दुष्काळातही जनता आनंदाने आणि समाधानाने दिवाळी साजरी करत असते कारण दुष्काळाचे संकट हे नैसर्गिक असते त्यामुळे जनता समजून घेत अश्याही परिस्थितीत सण साजरा करीत असते.
परंतु प्रचंड वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याने आनंदात दिवाळी कशी साजरी करायची या विवंचनेत जनता सापडली आहे...!!!