जळकोट, दि. १ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम यांनी गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व निराधार अशा २५ महिलांना स्वखर्चातून हवाई सफर करून तसेच देवदर्शन करून आणल्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी ग्रा.पं.सदस्य गजेंद्र कदम यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन महिलांना हवाई सफर व देव दर्शन करून आणल्याबद्दल गजेंद्र कदम व त्यांचे बंधू ॲड.रवींद्र कदम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गजेंद्र कदम यांच्या परिवाराकडून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अर्जुन कदम,मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष यशवंत पाटील,बसवराज भोगे, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर वाडीकर, गिरीश नवगिरे,राहुल पाटील,व्यंकट कुलकर्णी,आप्पू मडोळे,करदूरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.