मुरुम, ता. उमरगा, दि . ३१ :
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लाठी असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने लाठी हा ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ असून इतर खेळाप्रमाणे यास विशेष दर्जा देवून क्रीडा विभागाकडून पारंपारिक खेळाच्या यादीत समावेश करण्यात यावा, असे निवेदन शुक्रवारी (ता. २९) रोजी महमदरफी शेख यांनी दिले.
यावेळी विजय शिगवण व कुमारी श्रेया व्हंडरे उपस्थित होत्या. या निवेदनावर लाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, सरचिटणीस सुराज मोहिते यांच्या सहया आहेत. लाठी या क्रीडा प्रकारास मान्यता मिळून देण्यास योग्य ते सहकार्य करू, अशी ग्वाही माननीय राज्यपालांनी यावेळी दिली.