उमरगा ,दि .३१
देशात बेरोजगारांची समस्या असताना प्रथम एजुकेशन फाउंडेशन मुंबई शाखा किल्लारी तर्फे बेरोजगार युवकांना मोफत सौर उर्जा प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणार असे अजय चांदोरकर यांनी किल्लारी येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात व्यक्त केले.
प्रथम एजुकेशन फाउंडेशन किल्लारी येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सदाशिव साबळे हे होते
यावेळी श्री चांदोरकर यांनी जगासमोर पर्यावरण बदलामुळे नैसर्गिक समस्या निर्माण झाल्या असून कोळसा पाणी इंधनाची भविष्यात वीज निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. तेव्हा सुशिक्षित बेरोजगारांनी सौरऊर्जेचे प्रशिक्षण घेऊन स्वतःबरोबर देशाच्याही आर्थिक विकासास हातभार लावावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री साबळे यांनी लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी परिसरातील असंख्य बेरोजगार युवक व युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश धुळे यांनी तर आभार अंगुल कुमार सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी भालेराव, सतीश कांबळे, विशाल माळी, बसवराज साताळे, सोमनाथ घोडके, बालाप्रसाद पाचंगे, तुषार निधानकर, राम कोथिंबिरे, अरविंद पवार यांनी परिश्रम घेतले.