इटकळ , दि .३ :
प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील प्रकाश निवृत्ती साखरे यांच्या गट नंबर ५३ येथील शेतात तलाठी ए. बी काळे , कृषी सेविका श्रीमती एस टी राजमाने यांनी प्रत्यक्षात जाऊन खरीप हंगामातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली.
यावेळी सोयाबीन या पिकाला पुर्ण पाणी लागल्या मुळे संपुर्ण सोयाबीन हे पिक सडलेले असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले व ते पिक काढणीस योग्य नसल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी गावातील मधुकर घाडगेसह नागरिक होते.