लोहारा , दि . २
लोहारा बु. नगरपंचायत यांच्या वतीने शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी न.पं. च्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरातील लोकवाचनालायात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षामध्ये जेष्ट नागरिकांना विरंगुळा व्हावा म्हणून नगर पंचायतीच्या माध्यमातून वाचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक यांचा नगर पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम लोहारा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी मनोज खराडे, नगर अभियंता सुमित पाटील, कमलाकर मुळे, संदीप सातपुते, नवनाथ लोहार, श्रीशैल्य मिटकरी, व शहरातील जेष्ठ नागरिक, यांच्यासह आदी उपस्थित होते.