मुरुम, दि. २  : 

उमरगा तालुक्यातील बेडजवळगा येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्यांदा यश मिळवून ६२९ वी रँक मिळविल्याबद्ल मुरुम येथील विठ्ठलसाई कारखान्याच्या सभागृहात शुक्रवारी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांच्या आगामी वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. 


यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे आदींची उपस्थिती होती.
 
Top