तुळजापूर ,दि .२

आपला गाव मूलभूत सेवा सुविधायुक्त असावा,अंगणवाडी,स्मार्टशाळा, आरोग्य व्यवस्था,शेतीला पूरक पोषक व्यवस्था,पशुधनाचे आरोग्य तपासणी आदीसह मानव निर्देशांक वाढवण्यासाठी तसेच खोताचीवाडी गाव विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी यावेळी केले.


तालुक्यातील खोताचीवाडी येथे आमदार संवाद मंचच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सहकार्याने समृद्ध गावं बनवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. दि.2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि स्वच्छतेचे आद्य प्रसारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गावातील रस्ते झाडून व वृक्षारोपण करून आपला गाव समृद्ध गाव या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी गावकऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या अस्मिता कांबळे यांनी मंजूर केल्या.

यावेळी आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ.सतिश महामुनी,पंचायत समिती माजी सभापती शिवाजी गायकवाड,माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,सरपंच परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजीत हंरगेकर,आनंद कंदले,बबन नाना जाधव, गोविंद डोंगरे,तानाजी जाधव,धनाजी धोतरकर, पत्रकार सचिन ताकमोघे, अमरराजे परमेश्वर, केंद्रप्रमुख तानाजी महाजन, राजकुमार कोरेकर, गणेश कोरेकर, , शाळा व्य.समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर,नागनाथ शिंदे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, तुकाराम क्षिरसागर, भानुदास सरडे, सचिन शिंदे, विकास शिंदे, विकास पवार,भरत क्षिरसागर,सुखदेव पवार ,रामचंद्र पवार ,उमेश माने, नारायण पवार ,वसंत क्षिरसागर, बाबुराव शिंदे, संग्राम सरडे, मोहन पवार, अभिजीत शिंदे, अण्णा डांगे,लक्ष्मण पवार, सागर पवार, आरोग्य कर्मचारी मंडलेवाड, आरोग्य सेविका गडदे ,आशा गुरव ,स.शि. क्षीरसागर मनिषा  इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके तर आभार  आमदार संवाद मंचचे समुपदेशक  अनिल आगलावे यांनी केले.

 
Top