नळदुर्ग , दि .३ : सुहास येडगे  : 


आठ दिवसात नळदुर्ग शहरांतील रहीमनगर व रणे प्लॉटिंग येथे नगरपालिकेने रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आठ दिवसानंतर न.प.कार्यालयासमोर  नागरीकांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे रहीम नगर व मुळे प्लॉटिंग येथील नागरीकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 


या निवेदनात म्हटले आहे की,रहीम नगर हा भाग १९९३ च्या भुकंपानंतर वसलेला भाग आहे. याला लागुनच रणे प्लॉटिंग असुन याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासुन रस्त्याचे काम झाले नसल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर याठिकाणी गटारी नसल्यामुळे सांडपाणी पुर्णपणे रस्त्यावर येते त्यामुळे याठिकाणी कायम पाण्याचे डबके साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर या भागात लाईट देखील नाही. त्यामुळे हा भाग अंधारात असतो. भवानी नगर, रहीम नगर, रणे प्लॉटिंग व बी. के. हॉल या भागांतील नागरीकांनी रस्ता, गटार, लाईट,व पाण्यासाठी वेळोवेळी नगरपालिका कार्यालयात निवेदने देण्याबरोबरच आंदोलनेही केले आहेत. तरी नगरपालिकेचे याकडे दुर्लक्षच होत आहे. 


नगरपालिकेने येत्या आठ दिवसात या भागात रस्ता, गटार, पाणी व लाईटसह इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे अन्यथा आठ दिवसानंतर न.प.कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात नागरीकांनी दिला आहे. या निवेदनावर मन्सूर शेख , मिलिंद कुलकर्णी, महादेव देवकते, शेख अझर हमीद फुरखान जहागिरदार, नुर अहमद बागवान, शेख जमीर महेबुब,नागनाथ वचने, जुबेर शेख,मोहसिन शेख, तुळशिराम धोतरे, शिवाजी सोनकांबळे, महम्मद बागवान, संदिप बंदीछोडे,वसीम शेख, निजाम बागवान, दस्तगीर शेख, मोहसिन कागदी, रसुल मासुलदार,महेबुब पठाण, अकबर शेख, जाफर शेख, चांद शेख, यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top