तुळजापूर, दि ५ : डॉ.सतीश महामुनी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या अचूक नोंदी तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि खासदार यांना वास्तव परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने अचूक नोंदी घेण्यासाठी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या शेतात पाठवून नोंदी घेतल्या आहेत, तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी तातडीने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर व इरशाद शेख यांनी दिलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थिती अनुषंगाने पासून पाठपुरावा केला आणि त्याला चांगले यश मिळाले आहेत परिणामी पिक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी काक्रंबा आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अचूक नोंदी घेण्यासाठी कामकाज केले. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या पाठपुरावाचा फायदा मिळणार आहे.
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्याचे दावे विमा कंपनी कडे केले होते, अशा शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले , पंचनामा मध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी चुकीची माहिती संकलन करतात , अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची टक्केवारी वास्तवापेक्षा पेक्षा कमी दाखवतात, बाधित क्षेत्र कमी दाखवणे, कोऱ्या पंचनामा सह्या घेणे असे प्रकार सुरू होते त्याच्याविरुद्ध तालुक्यातील शिवसेना नेते चेतन बंडगर आणि इरशाद शेख यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ कौस्तुभ दिवेगावकर व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली.
सदरील तक्रारीच्या अनुषंगाने ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले व चुकीचे झालेले पंचनामे दुरुस्त करण्यासाठी कामकाज करण्यात आले. येथील शेतकऱ्यांना अडचण येऊ देणार नसल्याचे आश्वासन या पथकातील सदस्यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर झालेल्या अतिवृष्टी नंतर जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पिक विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीच्या नोंद घेण्यासाठी राज्यभर कार्यक्रम सुरू झाला मात्र यामध्ये पिक विमा कंपन्या कडून करण्यात आलेल्या कारभाराविरोधात तुळजापूर तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी लक्षवेधी निवेदन दिल्यानंतर चुकीच्या नोंदी बदलून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे प्रक्रिया करण्यात आली आहे यामुळे वास्तवात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे या कामांमध्ये शिवसेनेच्या चेतन बंडगर आणि इरशाद शेख यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवल्यामुळे शेतकरी वर्गातून जिल्हाधिकारी डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर व खासदार ओमराजे निंबाळकर यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.