तुळजापूर दि . ५ : 


तुळजापूर शहरातील बऱ्याच वर्षापासून  विविध भागातील पथदिवे नसणार्‍या नवीन बस स्थानक, मंगळवार पेठ, भवानी रोड, शुक्रवार पेठ या सर्व ठिकाणी नवीन पथदिवे सुरू करण्यात आले आहेत याचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी आणि इतर मान्यवरांनी पूजन करून शुभारंभ केला.

 यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  युवा नेते विनोद  गंगणे यांच्या विशेष प्रयत्नातून व वारंवार केलेल्या पाठपुरावातून सदरील काम पूर्ण झाले आहे,  प्राधिकरण योजनेमधून हे पथदिवे उभारण्यात आले आहेत.  तुळजापूर शहरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्यात आले आहेत.

   यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक अविनाश गंगणे,नानासाहेब डोंगरे,नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,गुंडु कदम,आनंद क्षिरसागर,श्याम  क्षिरसागर,दत्ता क्षिरसागर,विलास बापु शिंदे.संजय जाधव,अँड जनक पाटील, प्रकाश मगर, दिगंबर कदम,बाळासाहेब क्षिरसागर,सर्वोत्तम जेवळीकर आदी भागातील नागरिक उपस्थित होते.
 
Top