तुळजापूर , दि .२८
पुणे येथील राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूर च्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत ०६ सुवर्ण पदक व ०५ रौप्य पदकांसह १७ पदके मिळवली. मोबाईल च्या युगात क्रिडा क्षेत्रात चमकदार कामगीरी करणार्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्र पिता महात्मा गांधी जयंती निमित्त
पुणे शहर कराटे असोसिएशन व युनिव्हर्सल स्पोर्टस् यांचा मान्यतेने एरंडवना, पुणे येथील अनुसया खिलारे माॅडेल स्कूल मध्ये पार पडलेल्या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगीरी करत पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी ०६ सुवर्ण पदक, ०५ रौप्य पदक व ०६ कांस्य पदकासह एकूण १७ पदके मिळवली. या खेळाडूंना न्यू कराटे डू असोशियशनचे सुधाकर उळेकर व ज्ञानेश्वर गाडे यांचे मार्गदर्शन लाभले. फेसबूक आणि व्हाट्सापच्या जमान्यात क्रिडा क्षेत्रात चमकदार कामगीरी करणा-या खेळाडूंवर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
● सुवर्ण पदक ●
प्रथमेश अमृतराव , नयन मगर , वेदीका दिरगुळे , राजगुरू संघर्ष , सार्थक पारदे
पवार गणेश
● रौप्य पदक ●
विनायक चव्हाण , सिद्धी चव्हाण ,सृष्टी साळुंखे , यश हंगरगेकर , दुर्गेश दिरगुळे
● कांस्य पदक ●
सुयश पवार , समर्थ गायकवाड , दिशा पवार श्रेया गिड्डे , संयोगिता हाजगुडे , रुद्र मलबा