तुळजापूर , दि .२९
वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्या सहकार्याने शेतकरी गटाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ.भगवान अरबाड यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ.अरबाड म्हणाले की,बळीराजा सुखी तर सर्वजण सुखी,सध्याचे शेतीविषयक वातावरण ,या हंगामात घेतली जाणारी पिके,पाण्याचे नियोजन,शेतकऱ्यांनी शेतीतील करावयाचे माती-पाणी परीक्षण,रब्बी पिक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी च्या माध्यमातून विकसित केलेले ‘बायोमिक्स’ व जैविक खत सर्व शेतकऱ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले.बायोमिक्स मुळे शेतकऱ्यांना हरभरा,ज्वारी, तुर,कांदा या पिकावर फवारणी केल्याने मर,करपा रोगाला आळा बसून पिकाची जोमाने वाढ होते .हे जैविक खत असल्याने त्याचे इतर परिणाम होत नाहीत.हे बायोमिक्स 150 रुपये किलो या प्रमाणे कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध असून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
शेतीविषयक पिकाच्या कार्यशाळा,यशस्वी शेतकऱ्यांच्या बांधावर सहली,प्रशिक्षण वर्ग,आधुनिक तंत्रज्ञानातून शेती कशी फायद्याची ठरेल याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व वात्सल्य च्या सहकार्याने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रयोगशाळा सहाय्यक शाम शिंदे व शेतकऱ्यांचा गट उपस्थित होता.