तामलवाडी ,  दि  .११ : 

 लखिंमपुर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी  महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. तामलवाडी ता. तुळजापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.



या रास्ता रोकोसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील  पाटील ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी,   काँग्रेसचे काटीचे उपसरपंच सुजित हंगरकर यांच्या नेतृत्वाखाली  रस्तारोको  करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बसवणप्पा मसुते, शिवाजी सावंत शिवसेनेचे विभाग प्रमुख अप्पूराजे भोसले गवळी , शाखाप्रमुख अमोल घोटकर, काँग्रेसचे चनाप्पा  मसुते, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, सतीश माळी, आप्पासाहेब रणसुरे , उद्योजक विकास खंडाळकर ,कृष्णा घोटकर ,ज्ञानेश्वर कदम, पांडुरंग लोंढे, सुरतगावचे विठ्ठल गुंड, सुनील नकाते ,  राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, तालुका राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष शरद जगदाळे , राष्ट्रवादी युवक नेते सागर पाटील, मारुती बेटकर ,महंमद मुजावर, तम्मा इटकर ,श्‍यामराव मिश्रा, सावरगावचे सरपंच रामेश्वर  तोडकरी आदीसह  परिसरातील शेतकरी व राजकीय पदाधिकारी  उपस्थित होते.
 
Top