तुळजापूर दि. ११ :


तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असल्यामुळे केंद्र सरकार विरोधात सुरू असलेले महा विकास आघाडीचे आंदोलन तुळजापूर बंद न करता केवळ निषेध निवेदन देऊन करण्यात येत असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांना दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, शेकापचे नेते उत्तम अमृतराव, शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, तौफिक शेख, शरद जगदाळे, राष्ट्रवादी नेते महेश चोपदार,  शिवसेना नेते संजय जाधव, बापूसाहेब नाईकवाडी यांच्यासह इतर महा विकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन यानिमित्ताने गोकुळ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
 
Top