नळदुर्ग ,दि .२२:
नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी मनसेची जोरदार तयारी जिल्हाध्यक्ष नवगिरे यांनी दिल्या पदाधिका-यांना सूचना
आगामी नगरपालिका निवडणूकीची मनसेकडून जोरदार तयारी सुरु झाली असून,पक्षाने आता पर्यंत लोकांच्या मनातील विषय प्रशासनासमोर मांडून ते सोडविण्यासाठी कामे होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे,शहरातील नागरी प्रश्न ज्या पद्धतीने मनसे आपली भूमिका मांडून प्रशासना समोर मांडते, त्यामुळे लोकांच्या मनात मनसे बदद्दल आकर्षक वाढत आहे, येणा-या नगरपालिका निवडणूकीसाठी मनसे जोरदार तयारी करत असून ११ ते १२ ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याबाबत पदाधिकारी कामाला लागले असून,त्याबाबत काल दि-२१ऑक्टोबर रोजी प्रभाग क्र-१ वसंत नगर येथे मनसेने बैठक आयोजित केली होती,त्या बैठकीत तेथील रहिवासी सुद्धा उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी उपस्थितांना मनसेच्या वतीने केलेल्या व करत असलेल्या कार्याच्या जोरावरच आम्ही निवडणूकिला सामोरे जाऊ,व पक्ष पदाधिका-यांना तयारीला लागावे अशी सूचना केली आहे,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,जनहित कक्ष व विधी विभागाचे अॅड.मतीन बाड़ेवाले, शहर संघटक रवि राठोड,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार,संदीप वैद्य, दिलीप राठोड,किरण राठोड,सुनील चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.