नळदुर्ग , दि . २२ :
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी मंत्री, बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी कै. शालीनीताई मधुकरराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दि. २० शालिनीताई यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, पर्यवेक्षक प्रा. नेताजी जाधव अधिक्षक धनंजय पाटील आदीसह सर्वांनी अर्पण केले.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी शालिनीताई या सात्विकतेच्या मूर्ती होत्या. त्यानी कौटुंबिक पातळीवरती फार मोठी जबाबदारी सांभाळली म्हणूनच चव्हाण मधुकरराव चव्हाण याना जनतेची सेवा करता आली. त्या हळव्या मनाच्या होत्या असे भावोद्गार काढले. तर रामचंद्र आलुरे यांनी तीन पिढ्या पासून चव्हाण कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधाचा उल्लेख करीत शालिनीताईच्या विषयी भावना व्यक्त करत असताना त्या एक समंजस व्यक्तिमत्व होत्या. सर्वांची आपुलकीने, जिव्हाळ्याने विचारपूस करीत व चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्या. दोन्ही पुत्रांवरती संस्कार करून सक्षमपणे त्यांना उभे करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यानी महिलांसाठी अणदूर क्षेत्रात चळवळ उभी केलेल्या आहेत. हे विसरता येणार नाही. त्या समाजाभिमुख व्यक्तिमत्व होत्या म्हणुनच सर्वसामान्या विषयी नेहमीच त्या मदतीसाठी अग्रही राहील्या असे उद्गार रामचंद्र आलुरे यांनी काढले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहून कै. शालिनीताई भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.