मुरुम, दि. १४ :
श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम नुकताच पार पडला असून आज गुरुवारी (ता.१४) रोजी यंदाच्या गळीत हंगामाच्या मोळी पुजनाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाच्या गळीत हंगामात ५ लाख मेंट्रीक टन ऊस गाळपाचे उद्यिष्टये ठेवण्यात आले आहे. गाळपाकरिता कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून तसे शिस्तबद नियोजन करण्यात आले आहे. विठ्ठलसाई हा या परिसरातील शेतकऱ्यांच्या मालकीचा व हक्काचा असल्याने या भागातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत-जास्त ऊस आपल्या विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे. यंदा एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याची पूर्ण काळजी व जबाबदारी कारखाना प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के बोनस देण्याचा निर्णय बसवराज पाटील यांनी जाहीर करुन प्रातिनिधीक स्वरूपात कर्मचारी एम. बी. पात्रे, एस. डी. भोसले यांना बसवराज पाटील यांच्या हस्ते बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, विराट कल्याणी, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादीकमियाँ काझी, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश आष्टे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, नगराध्यक्षा अनिता अंबर, माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीष पाटील, कुशाल पाटील, संचालक शरणप्पा पत्रिके, विठ्ठलराव पाटील, केशवराव पवार, विठ्ठलराव बदोले, माणिकराव राठोड, अँड. राजीव हेबळे, दिलीप भालेराव, संगमेश्वर घाळे, शिवलिंग माळी, चंद्रकांत साखरे, दिलीप पाटील, अँड. विश्वनाथप्पा पत्रिके, चंद्रकांत पाटील, मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्रमोद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, रशिद शेख, बबनराव बनसोडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करून पार पडला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या मोळी पूजन कार्यक्रमाप्रसंगी बसवराज पाटील, बापूराव पाटील, शरण पाटील, सादिकमियाँ काझी, रामकृष्णपंत खरोसेकर, विठ्ठल बदोले व अन्य.