काटी , दि .१४ :
काटी ता . तुळजापूर येथील शैक्षणिक दृष्टीने म असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला, अंगणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनिय आवस्था झाली आहे.
ग्रामीण भागातील सुसज्ज अशा शाळेच्या इमारतीत इयत्ता पहिली ते दहावी मधील अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी व ज्ञानार्जन करणारे शिक्षक व ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात. हाच मुख्य रस्ता पुढे तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला जातो.अनेक लहान मोठ्या वाहनांची या मार्गाने ये-जा असते. सद्यस्थितीत या रस्त्याची वाट अतिशय बिकट झाली आहे. या रस्त्यावरून चिखलातून ये-जा करताना विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्याकडे पहायला कोणाचेच लक्ष नसावे याची खंत व्यक्त करून संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देतील का असा प्रश्न येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजीब अहमद काझी यांनी विचारला असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायतकडे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.