उस्मानाबाद, दि. ७
उस्मानाबादचे ग्रामदैवत श्री धारासूरमर्दिनी मंदिरात गुरुवारी दि. ७ नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावर्षी ऐन नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून मंदिरे खुली करण्यात आल्याने देवीभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे पालन मात्र करावे लागणार आहे.
प्रारंभी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सपत्निक विधीवत घटस्थापना होऊन धारासूरमर्दिनी देवीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे पोपट शेरकर, बाळासाहेब यादव, श्रीकांत डोके, शैलेश कदम, अविनाश निरफळ, संजय डोके, करण डोके, सुरेश डोके, आदर्श साळुंके, अनिकेत इंगळे, दीपक जाधव, बालाजी शिंदे, अभिजित कोकाटे, मच्छिंद्र हवालदार, ओम यादव, संकेत साळुंके, युवराज खळदकर, प्रमोद डोके, पुजारी हनुमंत कदम आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.