चिवरी , दि . ७ : 


 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवार दि . ७ रोजी  घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. 

घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता देवीला महा अभिषेक ,महापूजा, महाआरती करण्यात आली. यानंतर सकाळी दहा वाजता मंदिराच्या गाभार्‍यात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो उदो च्या गजरात मंदिर परिसर गजबजून गेला होता कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे नवरात्र महोत्सव  भाविकाविना साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र राज्य शासनाने मंदिर खुले करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकासह, पुजारी मंडळ व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
 
Top