काटी , दि . २ :
जळकोटवाडी ता . तुळजापूर येथील जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी नवरात्र उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करीत नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
जगदंबा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाची कार्यकारिणी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी अध्यक्ष सोमनाथ फंड, माजी उपाध्यक्ष युवराज जाधव ,सरपंच गणेश डोलारे, बाबासाहेब पाटील, तुळशीराम बोबडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सव 2021मधील उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यंदा साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी नवरात्र उत्सव मंडळाचा अध्यक्षपदी रामलिंग देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप बोबडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष सोमनाथ फंड,माजी उपाध्यक्ष युवराज जाधव,सरपंच गणेश डोलारे,मार्गदर्शक बाबासाहेब पाटील, तुळशीराम बोबडे,अजित फंड,सागर बोबडे, संजय बोबडे, दयानंद देशमुख तसेच मंडळाचे बाबासाहेब फंड ,अक्षय फंड ,आण्णा जाधव,स्वागत फंड,अनिकेत बोबडे, दिपक फंड,सागर फंड,विशाल फंड,रणजित फंड,सुनिल बोबडे, राहुल फंड , महेश फंड,शिवम फंड,संग्राम फंड आदीसह नवरात्र उत्सव समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.