तुळजापूर , दि .२ :  

काक्रंबा  बीट मधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजी बंडगर यांनी शिक्षकांना आवाहन केले.
काक्रंबा बीट मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ येथील कुमारी अनुष्का सुरेश गुरव आणि जिल्हा परिषद  प्रशाला सलगरा दिवटी कुमार ओंकार नरहरी मुळे यांची नवोदय विद्यालय यासाठी निवड झाली असून आज दोघांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काक्रंबा बीट चे विस्ताराधिकारी श्री मल्लिनाथ काळे यांनी  करताना इयत्ता पाचवीच्या 23 शाळा असून एकूण 133 विद्यार्थी बसले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यामुळे मुख्याध्यापकांचा या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे आयोजन केलेले आहे असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी बंडगर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश गुरव ,नरहरी मुळे, काक्रंबा बीट विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे ,काक्रंबा केंद्राचे केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी  ,किलज केंद्राचे  केंद्रप्रमुख अशोक स्वामी ,केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव चव्हाण केंद्रीय मुख्याध्यापक सोळसे उपस्थित होते.
या कार्यक्रमात काक्रंबा बीट मधील उत्कृष्ट शाळा म्हणून अकरा शाळेची निवड केली होती ,त्या सर्व शाळेच्या यशोगाथा यांची पुस्तिका तयार करण्यात आली असून यशोगाथा पुस्तकाचे विमोचन बालाजी बंडगर आणि मल्लिनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद व खाजगी शाळेचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश सुर्वे ,विकास  पारधे, विजय माने ,जगन्नाथ वाघे, छगन जगदाळे, संजीवनी सरवदे, अश्विनी जोगदंड, शाळेतील सेविका अनुराधा शिरसागर यांनी परिश्रम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मोरडा शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे  तर आभार प्रदर्शन  केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी  यांनी केले.
 
Top