जळकोट, दि.६ : मेघराज किलजे  

     
तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी ता. तुळजापूर  येथे वन सप्ताहानिमित्त वन परिमंडळ अधिकारी तालुका उमरगा यांनी  शाळेस भेट दिली. 


यावेळी डिगोळे  यांनी मानमोडी शाळेतील सोयीसुविधा पाहून ,शाळा डिजिटल ,ई लर्निंग ,स्वच्छ परिसर पाहून शाळेस २० रोपे भेट दिली. यावेळी गरुड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  गणेश गरुड, वन सेवक  शिवराज कुकूरडे ,मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,प्राथमिक पदवीधर रमेश दूधभाते, रामकृष्ण मोहिते ,श्रीमती सुचिता चव्हाण आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top