नळदुर्ग , दि . १८
येथिल अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या वतीने नळदुर्ग शहरातील श्री अंबाबाई मंदीर सभागृहात ' मी दूर्गा ' हा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमाचे आयोजन अक्षरवेल महिला मंडळाने केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा , संकल्पना मुख्याध्यापिका संगीता शहा यांची होती. तर जगदेवी शंकरशेट्टी , शुंभागी कारंजे यांचे सहकार्य लाभले ,
होम मिनिस्टर सारखाच परंतु नवरात्र म्हणून ' मी दुर्गा ' या कार्यकमास महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती . या कार्यकमात एकूण साठ माहिलांनी सहभाग घेतला . कार्यकमाची सुरुवात गेम नी झाली .कोरोना काळात प्रथमच बाहेर पडलेल्या महिलांनी संपूर्ण कार्यकमाचा आनंद घेतला , संगिता शहा यांच्या नियोजनात हसत , खेळत , आनंदात प्रत्येक खेळाची फेरी पुर्ण करत अंतिम टप्प्यात दहा महिला राहिल्या .त्यानंतर चार महिला , चार मधून दोन , या मध्ये नाशिबाची पत्ते हा गेम पुर्ण करत अंतिम टप्प्यात दोन महिला राहिल्या त्यामध्ये बॉल गेम , फुगे फुगवणे , फोडणे असे गेम झाले . शेवटचा जनरल नॉलेजचे प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये गुणांकन करण्यात आले . त्यातुन प्रथम , द्वितीय विजेत्या निवडण्यातआले. त्यानुसार
प्रथम विजेती सौ .अंकिता हर्षद डुकरे ,
द्वितिय सौ सुविधा सचिन कासार ह्या दोन दुर्गातून मी दुर्गा सौ .अंकिता डुकरे प्रथम विजेती झाली . संगीता शहा व त्यांच्या टिमने
अतिशय मेहनत घेऊन तीन तासाच्या विविध गेममध्ये हसत खेळत मी दुर्गा कार्यक्रम यशस्वी झाले .
विजेतीना नगरसेवक नितीन कासार व त्यांच्या परिवाराकडून पहिले पारितोषिक मिक्सर , दुसरे पारितोषिक हँडग्राईंडर देण्यात आले .
, संगिता शहा , जगदेवी शंकरशट्टी, मिलन कासार , सुविधा कासार , गिता कासार , चंचला परळकर याच्या शुभहस्ते मी दुर्गा यांना सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलन कासार सुविधा कासार , कविता पुदाले, मीना काळे ,रेखा वऱ्हाडे , राखी दूबे , शोभा शिंदे , शोभा ठाकूर , गीता पुदाले , मंजूश्री डुकरे ,रोशनी धरणे , सौम्या उकंडे , युवराज्ञी उकंडे तसेच अक्षरवेलच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले . संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन संगिता शहा यांनी तर आभार कविता पुदाले यांनी मानले.