खानापूर , दि .९ : 


तुळजापूर तालुक्यातील खानापूर शिवारातील गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनचे ६० पोते चोरून नेल्याची घटना घडली आहे.याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 विनायक वसंतराव पाटील यांच्या गट नं.97/2 मधील गोदमाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनचे 60 पोती चोरून नेल्याची घटना सोमवार दि. 8 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.पाटील यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची रास करून शेतामध्ये असलेल्या गोदमामध्ये साठवून ठेवले होते.शेतामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोयाबीन वर डल्ला मारला.

यावेळी शेजारील शेतकऱ्यांन कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.यावेळी इटकळ दुरक्षेत्राचे बिट अंमलदार जाधव,पोलिस कॉन्स्टेबल शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी एक लोखंडी रॉड व चप्पल आढळून आली आहे.पोलिसांनी ते जप्त केली आहे.


 याबाबत विनायक पाटील यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम 457,380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तायवडे हे करीत आहेत.
 
Top