जळकोट,दि.११ 


महाराष्ट्रात सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प  झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्यावतीने या संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला असून,एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी सरकारकडे निवेदनाद्वारे मागण्या मान्य होण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.



यावेळी सरपंच अशोकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नवगिरे, कृष्णात मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, नामदेव कागे, अशोक कदम, नागनाथ कदम ,एसटी कर्मचारी राजकुमार माने, हनुमंत कदम, राजेंद्र सूरवसे, दिगंबर सुरवसे, नागनाथ जाधव, राम भोगे, दौला बागवान, सचिन कलशेट्टी, शिवराज कलशेट्टी, नरसिंग हिंडोळे, शंकर माने, संभाजी कदम, अमोल कुंभार, रवि गायकवाड, अर्जुन मोरे, नारायण राठोड, दयानंद लोखंडे, शिवशंकर कांबळे, दादाराव पवार, तानाजी राठोड, संगीता मोरे, विनायक कदम, निळकंठ छत्रे, धनराज छत्रे, आबीद शेख, रमेश राठोड, विजय पवार, रुपेश राठोड, धनराज आतकरे आदि चालक, वाहक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
 
Top