वागदरी , दि .११ : एस.के.गायकवाड
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने शासकीय सेवेत सामावून घेवुन शासकीय राज्य सेवेतील सर्व नियम व सुविधा लागु कराव्यात या प्रमुख मागणीसह अन्य मागणी करिता वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादच्या वतीने एस.टी. कर्मचा-यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे निवेदन दिले.
आपल्या न्याय हक्काच्या मागणासाठी गेल्या सात आठ दिवसापासून राज्यातील एस.टी.कर्मचारी टप्प्या टप्प्याने संपावर गेले. सध्या राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जावून तिसरा दिवस संपला आहे. तरी सरकारला जाग येत नाही. यामुळे सरकारला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणी करिता भव्य प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली.शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला. येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष प्रविण राणबागुल,मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य भैय्यासाहेब नागटिळे,जिल्हा अध्यक्ष बी.डी.शिंदे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा जिनत प्रधान, जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब जानराव, युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप आडे सह पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होत.