नळदुर्ग  , दि . ११ : विलास येडगे

अनेकदा तक्रारी अर्ज देऊनही माझे वीजबिल माझ्या मिटर क्रमांकानुसार व रिडींग नुसार मिळत नाही. या महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ मी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या मुंबई येथील दालनासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते मारूती खारवे यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


     
 या निवेदनात मारुती खारवे यांनी म्हटले आहे की, दि.२६ जुलै २०२१रोजी माझे वीजबिल मीटर क्रमांकानुसार व रिडींगनुसार मिळावे याबाबत आपणाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर याचविषयी पुन्हा दि.७ ऑगस्ट व २७ ऑगस्ट २०२१ या दिवशीही आपणाकडे तक्रार अर्ज दिला आहे. तरीही आजपर्यंत मला माझे वीजबिल मीटर क्रमांकानुसार व रिडींग नुसार मिळाले नाही. सध्या मला वीजबिल येत आहे ते अंदाजे व मीटर क्रमांकानुसार येत आहे. त्यामुळे भविष्यात जर मला वाढीव वीजबिल आले तर याला जबाबदार महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी राहतील. विजग्राहकांना विनाकारण त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून यापुढचे वीजबील मला माझ्या मीटर क्रमांकानुसार व रिडींगनुसार देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अन्यथा आपण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे मारुती खारवे यांनी या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत नितीन राऊत, ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आले आहे.

 
Top