तुळजापूर , दि .९ :
सुनील मधुकरराव चव्हाण विचार मंचच्या वतीने दिपावली व भाऊबीज निमित्त लकी ड्रा व न्यु होम मिनिस्टर अर्थात खेळ खेळूया पैठणीचा भाग-3 हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात तुळजापूर येथे पार पडला .
सुनील चव्हाण विचारमंचचे संस्थापक तथा नगरसेवक सुनील संभाजीराव रोचकरी व सौ प्रियंका सुनील रोचकरी यांच्या पुढाकाराने येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात सुप्रसिद्ध अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अर्थात तुळजापूरच्या तिसऱ्या होम मिनिस्टर कोण ? व लकी ड्रॉ या अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी चंचला बोडके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शामल वडणे, डॉ.शुभांगी धीरज पाटील, माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर, डॉ.कामाक्षी मलबा यांच्या हस्ते करण्यात आले .तर प्रमुख पाहुणे म्हणून झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या, तुला पाहते रे ,का रे दुरावा, तुझं माझं ब्रेकप, अशा एका पेक्षा एक सरस मालिकांसहअनेक मराठी सिनेमातुन आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मराठी माणसांना आपलंस करणारे सुप्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप ,अभिनेते शंतनु गंगणे, सौ कांचन गंगणे हे अतिथी म्हणून उपस्थिती होते.याशिवाय मयूरी अभय पाटील, कविता कल्याण साळुंके, अन्नपूर्णा राहुल भालेकर, अमृता सुदर्शन वाघमारे, अपर्णा श्रीकांत कावरे, योगिनी धनंजय शहापुरे, बाल गायिका सहयाद्री मळेगावकर आदींची उपस्थिती होती.
झी मराठी व कलर्स वाहिनीवरील कारभारी लयभारी व लक्ष्मीनारायण मालिका फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे , कार्यक्रम आयोजक प्रियंका रोचकरी, नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या हस्ते सहा लकी ड्रॉ व न्यु होममिनिस्टर स्पर्धेतुन तुळजापूरच्या तिसऱ्या होम मिनिस्टर ठरलेल्या सहा विजेत्या पैठणीच्या मानकरी महिलांसह शंभर प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
तुळजापूरच्या तिसऱ्या होम मिनिस्टर अर्थात मानाच्या पैठणीचा मान मिळवून विजेत्या ठरलेल्या पल्लवी डोके, स्वाती कावरे, अश्विनी हिरोळीकर, मानसी कोंडे, मोक्षदा कोल्हे, कलावती व्यवहारे यांना एलईडी टीव्ही ,आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रिज, ओव्हन, मिक्सर व पैठणी स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याशिवाय पहिल्या तीन लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलांना मानाची पैठणी देण्यात आली.या कार्यक्रमात मनमुराद गप्पा, ऑर्केस्ट्रा ,खेळ आणि त्यातील गोडवा सांगणारी उखाण्यांची ठसक आणि पैठणीचा मानकरी ठरण्यासाठी महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह व एकमेकींमधील स्पर्धा यामुळे होमिनिस्टर कार्यक्रमात मोठी रंगत आली होती. विविध खेळ प्रश्नोत्तरे उखाणे व नृत्याविष्कारासह एका पेक्षा एक बहारदार उपक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करण साळुंके, सुदर्शन वाघमारे, राहुल भालेकर, सचिन सुरवसे, दादा अमृतराव, शिवाजी अमृतराव, विशाल रोचकरी, विनीत रोचकरी, अक्षय सुरवसे ,अभिषेक साळुंके, प्रेम प्रयाग, दत्तात्रय कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास तुळजापूर शहर व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.