नळदुर्ग , दि . ७ :  


येथिल ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात महाराष्ट्राचे दैवत  छत्रपती शिवाजी महाराज की जय"  असा जयघोष करणा-या पर्यटकाना कर्मचाऱ्याने मज्जा केल्याच्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने  निषेध करुन साहय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवुन त्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात शिवसेनेच्या पदाधिका-यानी पुढे म्हटले आहे की,  नळदुर्ग किल्ला  पाहण्यासाठी  शनिवार  दि . ०६ नोव्हेंबर  रोजी   काही पर्यटक   किल्ल्यात  आले .  त्या पर्यटंकानी  किल्ल्यामध्ये  "छत्रपती शिवाजी महाराज की जय"  अशी घोषणा दिल्या. यावेळी  त्यांना पुरातत्व खात्याच्या कर्मचा-याने  घोषणा देण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 

या घटनेचा नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून  सबंधित कर्मचाऱ्यावर   कारवाई करून त्याची बदली करण्याच्या मागणीचे  निवेदन नळदुर्ग पोलीसाना देण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी शिवप्रेमी


या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलाकर  चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष  पुदाले, उपशहरप्रमुख शाम कनकधर, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख नेताजी महाबोले, युवासेना शहरसंघटक खंडु माने यांच्या स्वाक्ष-या आहेत. याची एक प्रत पुरातत्व विभागाचे संचालक याना पाठविल्याचे शहर प्रमुख संतोष पुदाले यानी सांगितले .

नळदुर्ग किल्ल्यात घडलेल्या घटनेशी युनिटी कंपनी सबंध नाही

किल्यात घडलेल्या घटनेशी युनिटी मल्टीकॉन कंपनीचा कांहीही संबंध नाही
सदर घटना क्लेशदायक आहे, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यास विरोध करणे दुर्दैवी आहे.

कफिल शब्बीर मौलवी
व्यवस्थापकीय संचालक
युनिटी मल्टीकॉन कंपनी
सोलापुर
 
Top