नळदुर्ग ,दि .८ :
येथिल शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले यांच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त नगरपालिकेच्या सफाई कामगार यांना फराळ व आहेर म्हणून कपडे करण्यात आले.
शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याची भूमिका बजावणाऱ्या या सफाई कामगारांना फराळ कपडे वाटप करण्यात आले.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व ठप्प होते. घराच्या बाहेर ही कोणी पडत नव्हते. पण सफाई कामगार हे आशा परिस्थितीत रस्त्यावर उतरून सफाई करणे, जंतुनाशक फवारणी करणे, गटारी काढणे इत्यादी कामे करून शहराला रोगमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केले. त्यामुळे त्यांचा आज दिवाळी पाडव्यानिमित्त शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी त्यांना फराळ व कपड्याचे आहेर करून त्यांचा बहुमान केला.
या कार्यक्रमासाठी माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण , उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, नगरसेवक नितीन कासार, बसवराज धरणे, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक शरद बागल, दीपक काशीद, शिवसेनेचे उपशहरप्रमुख शाम कनकधार, मयूर हुलगे, नगरपरिषदेचे कर्मचारी मुनिर शेख, अफझल कुरेशी व नगरपरिषदेचे सफाई कामगार व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न