शहर पञकार संघाचे उस्मानाबाद  जिल्हाधिकारी कार्यालया  समोर उपोषण सुरु असल्याचे छायाचिञ  


नळदुर्ग , दि . ८ :  विलास येडगे 

 येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील नियमबाहय गुंठेवारी केल्याप्रकरणी चौकशी करुन दोषीविरुध्द कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार दि. ८ नोव्हेंबर  रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण नळदुर्ग शहर पञकार  संघाच्या वतीने  करण्यात येत  आहे. यासंदर्भात यापुर्वीच उस्मानाबाद  जिल्हाधिकारी याना अनेकवेळा निवेदनाद्वारे मुख्याधिकारी  यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांनी केले होती. माञ जिल्हा प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही.


नळदुर्ग येथील कांही सर्व्हे. मधील जमीन धारकांनी मुख्याधिकारी यांना हाताशी धरुन त्यांच्याकडून बेकायदेशीर व नियमबाहय गुंठेवारी करुन घेण्याचा प्रयत्न होत आहे. कांही जागा मालकांनी पालिकेच्या दप्तरी अशा नोंदी केल्या असून कांही नोंदी बनावट ही झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील अशा जमीन मालकांकडून केलेल्या गुंठेवारी च्या नोंदी प्रमाणे अनेक बेकायदेशीर खरेदी खत केले जात आहेत. वास्तविक पाहता शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन पालिकेच्या दप्तरी मुख्याधिकारी यांच्याकडून नोदी करण्यात आल्या आसून यामध्ये मुख्याधिकारी यांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे. 

दरम्यान अशा नोदीच्या प्रकरणात अनेक गुंठेवारीच्या प्लॉटची विक्री ही जोमात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना याचा मोठा अर्थीक फटका बसत आहे. अशा परिस्थीतीत जागा मालकांकडून सर्वसामान्य नागरीकांकडून प्लॉट खरेदी करुन घेत आसल्याने त्यांची मोठया प्रमाणात फसवणूक होत आहे. कारण पालिकेमध्ये कांही बेकायदेशीर गुंठेवारीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत तर विशेष म्हणजे कांही नोदी या बनावट गुंठेवारीच्या झाल्या आहेत. त्या कोणत्या नोदी आहेत ,यांची सर्वसामान्य नागरीकांना समजत नाही, त्यामुळे प्लॉट खरेदी करुन घेताना नागरीकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. म्हणून या सर्व बाबीची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात यावी म्हणून शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांनी या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी निवेदन देवुन मुख्याधिकारी  यांची  चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी केली  होती. 

  माञ याप्रकरणी कसलीही कारवाई झाली नसल्याने  आज सोमवारी  जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. संबधिताना दिलेल्या निवेदनावर पञकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य  विलास येडगे, तानाजी  जाधव ,शिवाजी नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top