नळदुर्ग , दि . ८ : एस.के.गायकवाड

दि.७ नोव्हेंबर  रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा श्रीमंत छत्रपती राजे प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून  आलियाबाद नळदुर्ग येथील "आपल घर"  येथे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.


  
जनसेवा बहुउद्देशिय शिक्षण संस्था नळदुर्ग च्या वतीने आपल घर येथे विद्यार्थी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आपल घर प्रकल्पाचे व्यवस्थापक विलास वकील, राष्ट्र सेवा दलाचे सरचिटणीस गुंडु पवार,राष्ट्र सेवादलाच्या पुर्ण वेळ कार्यकर्त्या जयश्रीताई माजगावकर (सातारा) आदी होते.

   
प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजा रेवाप्पा सोनकांबळे यांनी केले.तर सुत्रसंचलन संस्थेचे सचिव एस.के.गायकवाड यांनी केले. 

या प्रसंगी विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून पै.रेवाप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ आपल घर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी  बोलताना मारूती बनसोडे म्हणाले की, विद्यार्थी दिन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा दिवस होय,   महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपला सर्वांगीन विकास साधावा. या प्रसंगी जयश्री माजगावकर, विलास वकील, गुंडु पवार आदींचीही  भाषणे झाली. यावेळी विश्वानाथ कानडे,जगदीश भंडारे, दिलीप बनसोडे, लिंबाजी ,गायकवाड सह कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top