उस्मानाबाद , दि .१३
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुळजापूर येथे श्री . तुळजाभवानी मंदिरात महाआरती करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया रिलायन्स रूग्णालय मुंबई येथे यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियासाठी बुधवार दि. १० नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर पुढील आठवड्यामध्ये फिजियोथेरेपी करण्यात येणार आहे. ते या आजारातून लवकर बरे होऊन जनसेवेत यावे , यासाठी उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज दि . १३ नोव्हेंबर रोजी महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर , शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शामल वडणे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, शहर प्रमुख संजय मुंडे , माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे , तुळजापूर शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम , शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव , बाळासाहेब काकडे , पंकज पाटील , अमीर शेख , दिलीप जावळे, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, अभिजीत पतंगे , सुधीर चव्हाण , गोविंद कोळगे , साबिर सय्यद, अतिक सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.