उस्मानाबाद, दि .१४ :
जिल्हातील सलग दोन वर्षापासूनचा आदर्श शिक्षकाचा रखडलेला पुरस्कार त्वरीत देण्याची मागणी उस्मानाबाद जि. प .चे (प्राथमिक ) शिक्षणाधिकारी यांच्याकडे युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
शिक्षण क्षेञात उल्लेखनिय (शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,) या क्षेञात कामगिरी केलेल्या शिक्षकांना तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असलेल्या शिक्षकांना सदर पुरस्कार दिला जातो. यासाठी जिल्हा परीषद सेस मधून 2 लक्ष रूपयेची आर्थिक केली. प्रती वर्षी असते पण मागिल वर्षीचा व या वर्षीचा पुरस्कार अद्याप वितरण न झाल्याने त्वरित पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.
यासाठी दहा मानकांची पुर्तता पुस्तक प्रकाशने,वृत्तपञातील लेख प्रसिध्द आहे. शाळेला लोकवाट्यातून समृध्द करण्यासाठी प्रयत्न केले आहेत . नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असतील क्रीडा क्षेञात विद्यार्थ्यांचा सहभाग असेल अशा शिक्षकांची जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर शिक्षकांना गुण गौरव म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. तो मागिल वर्षीपासून रखडलेला पुरस्कार लवकर देण्यात यावा अशी मागणी बेंबळी ता. उस्मानाबाद येथिल युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.