नळदुर्ग ,  दि .१६ 

पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण,इतिहास संशोधक, शिवचरित्रकार,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे  निधन झाल्याने त्याना नळदुर्ग  शहरवासियाच्या वतीने श्रद्धाजली वाहण्यात आली.

शहरातील चावडी चौकात सोमवारी सांयकाळी श्रध्दाजलीचा कार्यक्रम संपन्न  झाला.  यावेळी मनसेचे सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेचे शहर  प्रमुख संतोष पुदाले, काँग्रेसचे नगरसेवक विनायक अहंकारी, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शामल वडणे, माजी नगरसेवक कमलाकर  चव्हाण यांनी बाबासाहेब पुरंदरे नळदुर्गच्या भुईकोट  किल्ल्यात भेट दिल्याचे  आठवण  सांगून   इतिहास  जिवंत करणारे पुरदंरे आपल्यातुन निघुन गेल्याने  महाराष्ट्र   शोकसागरात बुडाला आहे,अशा  भावना व्यक्त केल्या . यावेळी नगरसेवक नितिन कासार,  पत्रकार विलास येडगे, नगरसेवक बसवराज धरणे, शिवसेना उपतालुप्रमुख सरदारसिंग ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल  जाधव , सुनील गव्हाने, शाम कनकधर,  सुनील डुकरे,राजू महाबोले, संजय डुकरे, सुदर्शन पुराणिक, शांतनु डुकरे, सूरज जोशी,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top